व्यसनाधिनता हा उपाय नाही ती एक पळवाट आहे

          व्यसन लागणे म्हणजे एखादा आजार होण्यासारखे आहे. एखादा आजार बरा होण्यासाठी जर उपचार केले जातात तसेच उपचार व्यसनांवरती करणे गरजेचे असते. व्यसन म्हणजे एखादी अशी सवय कि ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची जाणीव होत असूनही त्यात बदल करणे शक्य होत नाही. व्यसनजन्य पदार्थामध्ये दारू, अफू, चरस, गांजा, भांग, ब्राऊन शुगर तसेच सिगारेट, तंबाखू, मिश्री, बिडी, हुक्का इ. येतात. काही लोकांमध्ये रेस, मटका, जुगार, लॉटरी, सट्टेबाजी इ. चे व्यसन आढळून येते. अलीकडील तरुणांमध्ये मोबईल, गेम्स व इंटरनेट यांचे व्यसन आढळून येते.

           धूम्रपान हे आपल्याला नाशाकडे नेणारे घातक व्यसन आहे . शारीरिक व आर्थिक हानी करणारे हे व्यसन आपल्या जीवावर देखील बेतू शकते, कधी याचा विचार केला का ? कॅन्सर सारखे रोग घेऊन येणाऱ्या व्यसनापासून त्वरित दूर व्हा . औषधोपचार व मानसोपचार तसेच आपल्या सहकार्याने कुठलेही व्यसन पूर्ण सुटू शकते व्यसनमुक्तीसाठी वैयक्तिक, कौटुंबिक व सामूहिक समुपदेशन केले जाते.