logo

Marriage Counseling

मॅरेज कौन्सिलिंग


               कौटुंबिक समस्या, कौटुंबिक कहल, वैवाहिक अडचणी, भांडण, चिडचिड यामुळे होणारे घटस्फोट अशा वैवाहिक नात्यातील समस्यांवर समुपदेशन केले जाते.

कौटुंबिक समस्या

विवाहानंतर बर्‍याच तरूणी स्वतंत्रपणे संसार करावा या विचाराच्या असतात. एकत्र कुटुंबात त्यांची राहावयाची तयारी नसते. अशा वेळी वेगळे राहण्यासाठी त्यांच्याकडून पतीवर दबाव आणला जातो. त्यासाठी प्रसंगी माहेरची मदत घेतली जाते. परंतु आर्थिक कारणांमुळे काही पुरूषांना स्वतंत्र संसार थाटणे शक्य होत नाही. त्यामुळे वेगळे राहण्याच्या विषयावरून पती-पत्नींमध्ये खटके उडू लागतात. वेगळे राहाण्याच्या विषयामुळे वैवाहिक संघर्ष अधिकच वाढू लागतो. वैवाहिक संघर्ष टाळण्यासाठी, नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी योग्य वेळीच विवाह समुपदेशकाचे (Marriage Counselor) मार्गदर्शन घेणे आवश्यक ठरते.

वैवाहिक अडचणी

वैवाहिक संघर्ष वाढत चालला की पती-पत्नींचे नातेसंबंध दुरावू लागतात. काहीवेळा पती-पत्नी एकत्र राहत असले तरी त्यांच्यात दुरावा निर्माण झालेला असतो. संघर्ष निर्माण झाल्यास समझोत्यासाठी दोघांनीही प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. संघर्ष निर्माण झाल्यास पतीपत्नींनी दीर्घकाळ अबोला धरू नये. एक तडजोड म्हणून ते पती-पत्नीची भूमिका पार पाडत असतात. पती-पत्नींनी वैवाहिक संघर्ष टाळण्यासाठी, नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी योग्य वेळीच विवाह समुपदेशकाचे (Marriage Counselor) मार्गदर्शन घेणे आवश्यक ठरते.

भांडण

पती-पत्नींचे स्वभावदोष बर्‍याच वेळा वैवाहिक संघर्षाला कारणीभूत ठरतात. वेगवेगळे स्वभाव असलेल्या व्यक्ती पती-पत्नी म्हणून यशस्वी संसार करतात परंतु स्वभावदोष संघर्षाची ठिणगी उडवायला कारणीभूत ठरतात. विनाकारण जोडीदाराबद्दल संशय व्यक्त केल्यास जोडीदार दुखावला जातो. बर्‍याच वेळा हा संशय जोडीदाराच्या चारित्र्याबद्दलचा जोडीदाराने संशय व्यक्त केल्यानंतर भांडणाला तोंड फुटते. त्यामुळे वैवाहिक संघर्ष वाढीस लागतो. वैवाहिक संघर्ष टाळण्यासाठी, नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी योग्य वेळीच विवाह समुपदेशकाचे (Marriage Counselor) मार्गदर्शन घेणे आवश्यक ठरते.

लैंगिक संक्रमित रोग

लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी) हा एक आजार आहे जो लैंगिक संबंधाने पसरतो. आज एसटीडीला सहसा लैंगिक संक्रमित संक्रमण (एसटीआय) म्हणतात. पूर्वी त्यांना व्हेनिरियल रोग (व्हीडी) म्हणतात. लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी) संक्रमित व्यक्तीकडून लैंगिक संपर्काद्वारे एखाद्या अनिर्बंधित व्यक्तीकडे संक्रमण होते. एसटीडी जीवाणू, व्हायरस किंवा परजीवी द्वारे झाल्याने होऊ शकते. उदाहरणांमध्ये गोनोरिया, जननेंद्रियाच्या नागीण, मानवी पॅपिलोमाव्हायरस संसर्ग, एचआयव्ही / एड्स, क्लॅमिडीया आणि सिफिलीसचा समावेश आहे.